Sunday, 4 December 2016

भूतान : हिमालयातील शेवटचे राज्य.

समाधानी लोकांचा आनंदी देश...

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील हिमालयीन पर्वत रांगेत असलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल उत्तरेस तिबेट आहे. हिमालयातील पर्वतरांगांचे मोहक दर्शन घडवणारा जगातील सगळ्यात आनंदी म्हणून ओळखणारा जाणारा देश म्हणजे 'भूतान'. माथ्यावर बर्फाचे उंचच उंच टिळे मिरवणारे पहाड. त्याच्या उतारांवरील हिरवीगार झाडांची अरण्ये, मध्येच वाहणारे खळखळते प्रवाह, पहाडांमधून नागमोडी वळणे घेत धावणारे रस्ते आणि या सगळ्याच निसर्ग संपन्नतेचे रसायन म्हणजे येथील सतत हसतमुख असणारी माणसे.......
 शब्दांकन :-सुदाम हाडपे.

Pratik Padhye | Travel Photographer.
हिमालयातील पर्वतरांगांचे मोहक दर्शन घडवणारा व जगातील सगळ्यात आनंदी म्हणून ओळखणारा जाणारा देश म्हणजे 'भूतान'. माथ्यावर बर्फाचे उंचच उंच टिळे मिरवणारे पहाड. त्याच्या उतारांवरील हिरवीगार झाडांची अरण्ये, मध्येच वाहणारे खळखळते प्रवाह, पहाडांमधून नागमोडी वळणे घेत धावणारे रस्ते आणि या सगळ्याच निसर्ग संपन्नतेचे रसायन म्हणजे येथील सतत हसतमुख असणारी माणसे.
भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील हिमालयीन पर्वत रांगेत असलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. 'थिंफू' ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.  भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात तर जगातील ८ व्या क्रमांकाचा सर्वात आनंदी देश आहे. महायान संप्रदायातील बौद्ध धर्म (वज्रयान) हा या देशाचा राष्ट्रिय धर्म आहे. विविध प्रकारच्या सुंदर व भव्य दिव्य असे  बौद्ध मठ व बुद्ध विहारे भुतानमद्धे मोठ्या प्रमाणात आढळतात.

     भूतानला ४७,००० किमी चे क्षेत्रफळ लाभलेले असून जनगणनेनुसार भूतानची लोकसंख्या अगदी  ७,५०,००० इतकी आहे. विसाव्या शतकापर्यंत जगापासून अलिप्त राहिल्यामुळे कोणत्याही संस्कृतीचे भुतांवर आक्रमण झाले नसल्याने भूतानला अद्वितीय असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षणही देशातील संस्कृती आणि परंपरा हेच प्रामुख्याने असते. त्यामुळे येथील सरकार सध्याची चालू संस्कृती, देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यावर भर देतांना दिसून येते. धूम्रपान बंदी असलेले भूतान हे जगातील पहिले राष्ट्र आहे. भूतान मद्धे तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखू विक्री करणे बेकायदेशीर आहे. घुडघ्याच्या लांबीचे झगे आणि अंगावर  कापडाचा पट्टा हा 'घो' ह्या नावाचा पुरुषांसाठीचा  तर शरीरभर बाह्यांचे जाकीट सारखी व पायापर्यंत लुंगीसारखी गुंडाळलेली "केरा" नावाने ओळखले जाणारे महिलांचे वस्त्र हे येथील राष्ट्रीय गणवेश आहे. येथील सरकारने  शाळा - महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमद्धे काम करणाऱ्या नोकरदारांना देशाचा राष्ट्रीय गणवेश सक्तीचा केला आहे.
मुखवटा घालून नृत्य तसेच  नृत्य व नाटकांसोबत पारंपारिक संगीत हि येथील पारंपारिक कलेची  वैशिष्ट्ये आहेत. उस्साही नर्तक रंगीबेरंगी लाकडी किंवा वेगवेगळ्या चेहऱ्याच्या मुखवट्यासोबत आणि शैलीकृत पोशाख परिधान करून, ध्येयवादी नायक, भुते, प्राणी, देव आणि सामान्य लोकांचे  हास्यचित्र, शब्दचित्र रेखाटणे इत्यादी गोष्टी येथे पारंपरिक सणांच्या दिवशी साजऱ्या केल्या जातात. येथील प्राचीन लोक धार्मिक चालीरीती रक्षित करताहेत तसेच मास्क बनवण्याचे प्राचीन पूर्वापार चालत आलेले किंवा ठराविक लोकांजवळ असलेले विशेष प्रकारचे ज्ञान आणि कला जतन करण्याचे काम देखील येथील सरकार लक्ष देऊन करते. साधारणतः २० च्या आसपास नद्या भूतान मधून वाहत असतात ज्यात प्रामुख्याने अमो छू (किंवा तोरसा), जलधाका नदी (किंवा दी चू), तांग चू, थिंपू चू, पारो छू, कुलाँग छू, तवांग चू (किंवा गामरी नदी), द्रांगमे छू (ही नदी मानस नदीचाच एक भाग आहे.) इत्यादी नद्या वाहत असतात. भूतानी ङुलत्रुम हे येथील अधिकृत छालं असून भूतानमधील बहुतांश ठिकाणी भारतीय चलनही स्वीकारले जाते.

एकूण राष्ट्रीय आनंद हे भूतानचे नाविन्यपूर्ण धोरण ओळखले जाते. जनतेने सुखी व समाधानी राहावे हे येथील सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो त्यामुळे भूतान खरंच एक विशेष स्थान आहे. बर्फाचे मुकुट घालून उभ्या असलेल्या पर्वतांच्या घेऱ्यात आणि सर्वत्र आनंदी व समाधानी असलेल्या लोकांमुळे भूतान हे पर्यटकांच्या गळ्यातील ताईतच बनलेले आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षणांपैकी 'पॅरो' नदीकिनारी वसलेले 'पॅरो' हे शहर. १९८५ साली फक्त एका रस्त्याच्या दोघा बाजूंनी रंगीबेरंगी लाकडांच्या फळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या दुकानांपासून वसवलेल्या ह्या शहरात सध्या अनेक दुकाने, इमारती आणि लज्जतदार भूतानी हॉटेल्स तयार झाली आहेत. सायंकाळच्या वेळेस ह्या शहरात फेरफटका मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पॅरो व्हॅली मधील वरच्या बाजूला  १६९२ मद्धे  भारतीय बौद्ध गुरु 'पद्मसंभवा' यांनी त्यांच्या ध्यानसाधनेसाठी आणि भूतान  मद्धे बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी बांधलेली 'टायगर नेस्ट" नावाची मोनेस्टरी प्रसिद्ध आहे.येथून जवळच तिंफूमद्धे  भगवाब बुद्धांचा सोने व कांस्य धातूपासून बनवलेली १७९ फुटांची भव्य मूर्ती आहे. तसेच पॅरो येथील भूतानी आर्किटेक्चर एक उच्च बिंदू म्हणून पॅरो 'डिझॉन्ग' चा क्रमांक लागतो. पॅरो, थिंफू,वंगडुईफोडरंग, गंगतेय, ट्रॉन्गस,बुमथांग, लहूनतसे, त्रशिगांग, तृशियांगत्से, सम्द्रूप  जॉन्गखा व्हॅली, मोन्गर आणि लहूनतसे, पुनाखा डिझॉन्ग इत्यादी अनेक प्रकारची सुंदर ठिकाणे भूतान मद्धे आहे. उघड्या डोळ्यांनी जरी तुम्ही भूतान मद्धे प्रवेश केला तरी हिमालयीन पर्वतरांगेतील प्रत्येक दृश्य फारच अप्रतिम असे असते. भूतान मद्धे फिरतांना साक्षात स्वर्गातील गावांमद्धे फिरण्यासारखे भासते. तेथील वाहणाऱ्या वाऱयामद्धे काही वेगळीच जादू असते, थंडगार अश्या वाऱ्याने मन इतके प्रसन्न होते कि भूतान म्हणजे देवभूमीच वाटू लागते. भूतानी लोकांचे वागणे - बोलणे, त्यांचे दिनचर्या, राहणीमान, संस्कृती, शिक्षण, कला, आहार आणि मुख्यदा त्यांच्या आनंदामागचे रहस्य शोधण्यात आणि त्यांच्या सोबत राहण्याची काही वेगळीच मजा असते. ज्या देशात शून्य टक्के गुन्हेगारी चा आलेख आहे, तिथे बिनधास्त फिरायला काही वेगळीच मजा असते.

भूतानमधील अतिशय तिखट असलेली प्रसिद्ध मिरची आणि तिच्या पासून बनवलेल्या 'इमा दातशी' आणि 'केवा दातशी' ह्या भूतानी प्रसिद्ध भाज्या नक्कीच आपल्या जिभेची सहनशक्ती बघत असतात. भूतान मद्धे फिरण्यासाठी अत्यंत कमी दरात टॅक्सी आणि बस सर्विसेस उपलब्ध असतात.बस ने प्रवास करावयाचा असल्यास एक दिवस अगोदर बस चे तिकीट बुक करावयाचे असल्याने बस मद्धे गर्दी होत नाही, त्यामुळे सगळ्यांना सध्या बस मद्ध्येही सीट मिळते आणि अत्यंत कमी दरात सफर पूर्ण करता येते. भूतान मद्धे जाण्यासाठी भूतान सरकारतर्फे ६ दिवसांचे परमिट मिळते, जे भारत- भूतान सीमेवर मिळते. काही कारणास्तव परमिट वाढवायचे असल्यास भूतान मधील 'थिंफू' येथे अद्यावत करता येते. 
त्यामुळे रोजच्या रुटीन मधून  वेळ काढून निदान काही दिवस तरी हिमालय पर्वत रांगेतील ह्या छोट्याश्या राज्याला भेट दिल्यास निसर्गसंप्पन्न भूमूतील चेहऱ्यावर अतोनात हास्यासोबत समाधानी आयुष्य जगणाऱ्या लोकांकडून नक्कीच आपणास प्रेरणा मिळेल. 

महाराष्ट्रातून भूतान ला पोचण्यासाठी- 
भूतान मद्धे प्रवेशासाठी तुमच्या जवळ पासपोर्ट असला तर उत्तमच नसेल तर मतदान कार्ड किंवा आधार कार्डनेही प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. मुंबई पासून 'पाश्चिम बंगाल' मधील 'हसीमरा' रेल्वे स्थानकावर उतरून 15 किमी अंतरावरील 'जयगांव' ह्या भूतान सीमेनजीकच्या गावात टॅक्सी किंवा बस ने पोचून भूतान प्रवेशाची प्रक्रिया पार पडू शकतात. किंवा मुंबई वरून हवाई मार्गाने भूतान ला पोचू शकतात.




छायाचित्र : प्रतीक पाध्ये.
शब्दांकन :  सुदाम हाडपे.
sudamhadpe@gmail.com